जळगाव विद्यापीठास ‘या’ तारखेपर्यंत दिवाळीच्या सुट्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ नोव्हेंबर २०२१ ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांसह प्रशासकीय कामकाजास दिवाळीनिमित्त १४ नोव्हेंबर पर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोमवारी यासंबंधी बैठक होऊन निर्णय घेण्यात आला. सुट्याबाबत एनमुक्टो प्राध्यापकांच्या संघटनेने ही मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

दिवाळी सुट्यांबाबत अकॅडमिक कॅलेंडर विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले होते. यात दिवाळी सुट्यांचा उल्लेख नव्हता. ही बाब एनमुक्टोने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाने सुधारित शैक्षणिक नियमिका प्रसिद्ध केली. यात हिवाळी व उन्हाळी सुट्या कमी करून दिवाळीच्या सुट्या ६ दिवसांच्या करण्यात आल्या.

एनमुक्टोची सोमवारी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांच्यासोबत बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. यासह अकॅडमिक कॅलेंडर समितीमध्ये प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा अशी मागणी एन.मुक्टोने केली. प्रभारी कुलसचिव आर. एल. शिंदे, व्यवस्थापन सदस्य दिलीप पाटील, प्रा. मोहन पावरा, प्राचार्य एल. पी. देशमुख, एन मुक्टोचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष प्रा. ई. जी. नेहेते, प्रा. डॉ. किशोर कोल्हे, प्रा. नितीन बाविस्कर, डॉ. आकाश गोस्वामी, प्रा. महेंद्र सोनवणे यांनी चर्चेत भाग घेतला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज