‘लेवा सखी घे भरारी’ मंडळातर्फे दीपावली उत्सवाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील ‘लेवा सखी घे भरारी’ महिला मंडळातर्फे दि. १६ व १७ रोजी ‘दीपावली उत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीसाठीच्या विविध सजावटीच्या वस्तू ,कपडेंसह पारंपरिक व घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले, खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

संपूर्ण देश गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारी मुळे त्रस्त असल्यामुळे बहुसंख्य कुटुंबांना आर्थिक संघर्षाला सामोरे जावे लागले. पण संकटाला संधी समजून अनेक गृहिणींनी खंबीरपणे स्वतःचे गृहउद्योग सुरू केलेत. प्रसंगी धान्य, डाळी, मसाले, खाद्यपदार्थ, कपडे, गृहोपयोगी वस्तू अशा विविध व्यवसायांच्या माध्यमातून घरपोच सेवा दिली. अशा महिलांना प्रोत्साहन मिळावे आणि ग्राहकांना सुद्धा एकाच छताखाली खास घरी बनवलेली उत्कृष्ट क्वालिटीची उत्पादने वाजवी किमतीत उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने ‘लेवा सखी घे भरारी’ या महिला मंडळाने दीपावली उत्सवाचे आयोजन केले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन), बीएसएनएल ऑफिसच्या मागे, जळगाव येथे दिनांक १६ व १७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यामध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ, घरगुती पद्धतीने तयार केलेले मसाले, दिवाळीसाठी विविध सजावटीच्या वस्तू , कपडे इत्यादी उपलब्ध असतील. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जळगावकर नागरिकांनी भेट देऊन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ‘लेवा सखी घे भरारी’ च्या संचालकांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज