fbpx

11 वी सीईटी अर्जासाठी मुदतवाढ द्यावी : दिव्या भोसलेंची मागणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२१ । इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागातर्फे सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षेकरिता अर्जाची मुदत संपली आहे. सीबीएसईचा निकाल उशिराने जाहीर झाल्याने अनेक विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी वंचित राहिले. त्यामुळे सीईटी अर्जासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक दिव्या यशवंत भोसले यांनी शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

त्या म्हणाल्या, की यासंदर्भात राज्यातीलभरातील पालक व विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. त्या अनुषंगाने आदरणीय आमदार रोहित दादा पवार व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे स्वीय सचिव विजय भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केले. त्यांना याबाबत अवगत केले. आगामी काळातही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज