fbpx

राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत जिल्हा संघाला अजिंक्यपद

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२१ । महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे नागपूर येथे झालेल्या १७ व्या सब-ज्युनियर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने यजमान नागपूर संघावर अंतिम सामन्यात चार धावांनी मात करीत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघातील खेळाडूंची शिबिरानंतर जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

शिवसेनेतर्फे खेळाडूंचा सत्कार
जळगाव जिल्हा संघाचे कर्णधार लोकेश पाटील, आयुष पाटील, कृष्णा महाजन, हर्षवर्धन भोईटे, कौशल भोई, प्रणव चव्हाण, महेश पाटील, गणेश पाटील, हेमराज अहिरराव, अभिजीत निनायदे, निरज सोनवणे, प्रशिक्षक अरविंद जाधव, व्यवस्थापक विजय पाटील, जळगाव शहर संघाचे प्रेम भावसार, रोहित बिन्हाई, संस्कार सांगोरे, आदित्य पाटील, वैभव सोनवणे, अनिस तडवी, साहिल तडवी, मिरमान तडवी, तन्वीर तडवी, राहुल जाधव, अजिंक्य पाटील, अबुजर पटेल, प्रशिक्षक साजीद तडवी, व्यवस्थापक तारेक पटेल, प्रशिक्षक मनोज जाधव, अरविंद जाधव, टीम मॅनेजर विजय पाटील आदी विजयी संघातील खेळाडूंचा आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व चोपडा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मुन्ना पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, जि.प.सदस्य हरिष पाटील, प.स.सदस्य एम.व्ही.पाटील, ए.के. गंभीर, नगसेवक किशोर चौधरी, प्रकाश राजपुत, राजाराम पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, शहर संघटक धिरज गुजराथी, युवासेना शहर प्रमुख प्रदीप बारी, शिवसेना उपशहरप्रमुख हरिश पवार, प्रताप पाटील, कैलास बाविस्कर, सुनिल पाटील, गणेश पाटील, संदिप पाटील, नरेद्र पाटील, सोमनाथ पाटील, रविंद्र पाटील, आबा बाविस्कर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज