शिक्षक सहकार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । शिक्षक सहकार संघटनेची बैठक रविवार दि.३१ रोजी प्रकाश लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी जितेंद्र गवळी यांची तर उपाध्यक्षपदी सुरेश बोरसे, किरण सावळे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीत मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्रांचे वितरण करण्यात आले.

शिक्षक सहकार संघटनेची जिल्हाध्यक्ष निवडीसाठीची बैठक रविवार दि.३१ रोजी बहिणाबाई उद्यान येथे कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्रकाश लंगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र गवळी, जिल्हा कार्याध्यक्षपदी ओंकार भिलाला, जिल्हा सरचिटणीसपदी भीमसिंह दाभाडे, जिल्हा संघटकपदी गोकुळ चित्ते, फिरोज तडवी, जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश बोरसे, किरण सावळे, महिला जिल्हा उपाध्यक्षपदी भारती शिंपी, जिल्हा कोषाध्यक्षपदी शत्रुघ्न भोई, जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी ध्रुवास राठोड, जिल्हा सहसंघटकपदी संतोष बागडे, जिल्हा सहसचिवपदी राजेंद्र राठोड, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कृष्णा गठरी, पांडुरंग पाटील, प्रमोद पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून भारती सोनवणे, संगीता लगडे व भारती ठाकरे यांची निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेचे राज्याध्यक्ष यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्य उपाध्यक्ष संदीप होळकर, राज्य संघटक गजानन देवकत्ते, विभागीय अध्यक्ष अविनाश जुमडे, नागपूर विभागीय अध्यक्ष रवींद्रकुमार अंबुले, पुणे विभाग सरचिटणीस दीपक प्रचंडे, वीरशैव लिंगायत गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भिमराज घुगरे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज