जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । वर्धमान भाऊ मित्र मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत मंगळवार दि.७ रोजी दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते गरजू दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलसह विविध उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये २७ तीन चाकी सायकल, ९ शिलाई मशीन, ४ व्हिल चेअर, ८ कुबड्या, ७ अंध काठ्या आदी साहित्याचा समावेश आहे. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता चाळीसगावातील भडगाव रोडवरील अंधशाळा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमास लाभार्थी दिव्यांग बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -