जिल्हा बँकेचे सूत्र ठरले : जाणून घ्या कोण, किती काळ राहणार अध्यक्ष, उपाध्यक्ष

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२१। जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक गुरुवार दि.२ रोजी अजिंठा विश्रामगृहात पार पडली. बैठकीत जिल्हा बँकेचे अध्यक्षपद पहिले तीन वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसला नंतरची दोन वर्षे शिवसेनेला देण्यावर तर उपाध्यक्षपद पहिले दोन वर्ष कॉंग्रेसला, नंतरची दोन वर्षे शिवसेनेला व उर्वरोत एक वर्ष राष्ट्रवादीला देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार दि.३ रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, सूत्र ठरले असले तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण? होणार याचा सस्पेन्स कायम आहे.

जळगाव जिल्हा बँकेसाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने २१ पैकी २० जागांवर दणदणीत विजय मिळविला आहे. यात राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला ७, कॉंग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाली आहे. दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर गुरुवार दि.२ रोजी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक अजिंठा विश्रामगृहात पार पडली. बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार चिमणराव पाटील, आामदार किशोर पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संचालक प्रतापराव हरी पाटील आदी उपस्थित होते. याबैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे व पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

निवडणुकीनंतरही राहणार आघाडी
यावेळी बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने एकत्रीत निवडणूक लढवून हे यश संपादन केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार हे एकनाथराव खडसे ठरविणार असून शिवसेनेच्या उपाध्यक्षपदाचे उमेदवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ठरविणार आहेत. तसेच महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वी जशी एकत्र होती, तशीच निवडणुकीनंतरही राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar