जिल्हा बँक निवडणूक : वाचा कोणाची काय आहे ‘निशाणी’

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी रविवार दि.२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी मंगळवार दि.९ रोजी ३१ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ११ जागा बिनविरोध झालेल्या असल्याने केवळ १० जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोमवार दि.८ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५० उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता केवळ ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ४२ उमेदवारांपैकी ११ उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत. त्यामुळे रविवार दि.२१ रोजी केवळ १० जागांसाठीच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या १० जागांसाठी एकूण ३१ उमेदवार रिंगणात असून या उमेदवारांना मंगळवार दि.९ रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.

भुसावळ विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार शांताराम धनगर यांना छत्री, आ. संजय सावकारे यांना विमान, यावल विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार प्रशांत चौधरी यांना बकेट, गणेश नेहते यांना नारळ, विनोदकुमार पाटील यांना कपबशी, रावेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार जनाबाई महाजन यांना कपबशी, अरुण पाटील यांना सिलिंग फॅन, राजीव पाटील यांना मोटारगाडी, चोपडा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार घनःश्याम अग्रवाल यांना कपबशी, संगीताबाई पाटील यांना पतंग, सुरेश पाटील यांना मोटारगाडी, इतर संस्था व व्यक्ती मतदार संघातील उमेदवार माजी आ.गुलाबराव देवकर यांना कपबशी, प्रकाश पाटील यांना तलवार, रवींद्र पाटील यांना मोटारगाडी, उमाकांत पाटील यांना बॉटल, प्रकाश सरदार यांना कपाट, महिला राखीव मतदार संघातील उमेदवार ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांना कपबशी, शैलजादेवी निकम यांना कपबशी, अरुणा पाटील यांना मोटारगाडी, कल्पना पाटील यांना मोटारगाडी, शोभा पाटील यांना बॅट, सुलोचना पाटील यांना टॉर्च, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातील उमेदवार प्रकाश पाटील यांना तलवार, राजीव पाटील यांना ऑटो रिक्षा, माजी आ.डॉ. सतीश पाटील यांना कपबशी, विकास पाटील यांना मोटारगाडी, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातील उमेदवार नामदेव बाविस्कर यांना एअर कंडिशनर, प्रकाश सरदार यांना कपाट, शामकांत सोनवणे यांना कपबशी तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदार संघातील उमेदवार मेहताबसिंग नाईक यांना कपबशी व विकास वाघ यांना मोटारगाडी असे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज