जिल्हा बँक निवडणूक : सहकार पॅनलच्या उमेदवारांना मिळाली ‘इतकी’ मते

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल सोमवार दि.२२ जाहीर झाला. यात महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकत आपले वर्चस्व राखले. तर एका जागेवर भाजपचे आमदार संजय सावकारे हे अपक्ष निवडून आले. आधीच ११ जागा या बिनविरोध झाल्याने उर्वरित १० जागांसाठी रविवार दि.२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० जागांसाठी सोमवार दि.२२ रोजी मतमोजणी झाली. यात रावेर मतदार संघातून जनाबाई महाजन, यावल मतदार संघातून विनोद पाटील, चोपडा मतदार संघातून घनश्याम अग्रवाल, भुसावळ मतदार संघातून आ.संजय सावकारे, इतर संस्था व व्यक्तिगत सभासद मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून माजी आ.डॉ. सतीश पाटील, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून श्यामकांत सोनवणे, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून मेहताबसिंग नाईक यांनी तर महिला राखीव मतदार संघातून ऍड.रोहीणी खडसे-खेवलकर व शैलेजा निकम हे विजयी झाले.

असे आहे उमेदवारनिहाय मतदान
भुसावळ विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार आमदार संजय सावकारे यांना २४, शांताराम धनगर यांना ४, यावल विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार विनोदकुमार पाटील यांना २५, गणेश नेहेते यांना २२, प्रशांत चौधरी यांना ०, चोपडा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार घनशाम अग्रवाल यांना ६३, संगीता पाटील यांना ०, सुरेश पाटील यांना ०, रावेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील उमेदवार जनाबाई महाजन यांना २६, अरुण पाटील यांना २५, राजीव पाटील यांना ०, अनुसूचित जाती, जमाती मतदार संघातील उमेदवार शामकांत सोनवणे यांना २,४६४, नामदेव बाविस्कर यांना ८३, प्रकाश सरदार यांनी ६८, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातील उमेदवार माजी आ.डॉ.सतीश पाटील यांना २,३१६, विकास पवार यांना २४२, प्रकाश पाटील यांना ४०, राजीव पाटील यांना २३, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील उमेदवार मेहताबसिंग नाईक यांनी २,३२६, विकास वाघ यांना २८०, महिला राखीव मतदार संघातील उमेदवार ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांना २,२३५, शैलजादेवी निकम यांना १,९२५, अरुणा पाटील यांनी ५२४, कल्पना पाटील यांना ११३, सुलोचना पाटील यांना ११, शोभा पाटील यांनी ६, इतर संस्था व व्यक्तिगत सभासद मतदार संघातील उमेदवार गुलाबराव देवकर यांना १,६०१, रवींद्र पाटील यांना १८१, प्रकाश सरदार यांना १३, प्रकाश पाटील यांना ७ तर उमाकांत पाटील यांना ३ मते पडली.

हे उमेदवार झाले होते बिनविरोध
मुक्ताईनगर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे, अमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आ.अनिल पाटील, चाळीसगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून प्रदीप देशमुख, धरणगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून संजय पवार, एरंडोल विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून अमोल पाटील, जळगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून महापौर जयश्री महाजन, जामनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून नाना पाटील, पाचोरा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आ.किशोर पाटील, पारोळा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आ.चिमणराव पाटील, बोदवड विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून ऍड. रवींद्र पाटील, भडगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून प्रताप पाटील हे ११ उमेदवार बिनविरोध झालेले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज