जिल्हा बँक निवडणुक : एरंडोलला ९४.५४ टक्के मतदान

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२१ । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एरंडोल तालुक्यात एकूण ११० मतदारांपैकी १०४ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९४.५४ टक्के इतकी राहिली.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी एरंडोल येथील रा.ती. काबरे विद्यालयातील केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील मतदारांची संख्या ३३ असून त्यापैकी एक मतदार वगळता सर्वांनी मतदान केले. तर इतर संस्था सभासद संख्या ७७ असून पैकी ७२ मतदारांनी मतदान केले. जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडून आलेले अमोल चिमणराव पाटील यांनी एरंडोल येथे मतदान केले. माजी आमदार व बँकेचे माजी संचालक महेंद्रसिंग पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित राजेंद्र पाटील यांनी सुद्धा मतदान केले. दरम्यान माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी मतदान केंद्राला भेट देऊन कार्यकर्त्यांकडून मतदानाबाबत माहिती जाणून घेतली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज