जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची निवड या तारखेला होणार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड ३ डिसेंबर रोजी हाेणार आहे.

जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया होणार आहे. ३ डिसेंबर रोजी दुपारी १ ते १.१५ वाजेदरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करणे, दुपारी १.१५ ते १.२५ वाजता नामनिर्देशनपत्राची छाननी, दुपारी १.३५ ते १.४५ अर्ज माघार घेणे, दुपारी १.५० वाजता उमेदवारांची यादी जाहीर करणे, दुपारी २ ते २.३० या वेळेत आवश्यकता असल्यास गुप्त मतदान हाेईल.

मतदानानंतर निकाल असा कार्यक्रम निश्चित आहे. बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही निवडणूक हाेईल. निवडीपूर्वी महाविकास आघाडीचे नेते, संचालकांची एकत्रित बैठक हाेईल. या बैठकीत अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -