पेंटर असोसिएशनतर्फे दिवाळीनिमित्त मिठाई वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । जळगाव येथील हिंदू-मुस्लिम पेंटर असोसिएशनतर्फे दिवाळीनिमित मिठाई वाटप करण्यात आली.

जळगाव येथील हिंदू-मुस्लिम पेंटर असोसिएशनतर्फे बुधवार दि.३ रोजी दिवाळीनिमित मिठाई वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस एजाज़ अब्दुल गफ्फार मलिक, वसीम खान, इस्माईल खान, आसिफ खान, अहेमद खान, संदीप पेंटर, गणेश प्रजापती, राजू पेंटर, करण पेंटर, दगडू पेंटर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पेंटर बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज