⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बांभोरी येथे शालेय साहित्याचे वाटप

बांभोरी येथे शालेय साहित्याचे वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । बांभोरी गावाचे सरपंच सचिन बिऱ्हाडे व भीमज्योत मित्र मंडळ यांच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरुशिष्य जयंती निमित्त बांभोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणुन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदभाऊ नन्नवरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत ठाकूर, विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे, कास्ट्राईबचे संघटनेचे रमेश सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन बिऱ्हाडे यांनी तर सुत्रसंचलन सुरेश नन्नवरे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर साळवी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका उषाबाई सुर्यवंशी, शाळेतील शिक्षकवृंद मनीषा पाटील, वृंदा गरुड व भीमज्योत मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.