fbpx

भरारी फाऊंडेशन व के.के.कँन्सतर्फे सीव्हील हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना पीपीई कीटचे वाटप

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२१ । पद्मावती मंगल कार्यालयात रुग्णांच्या 60 नातेवाईकांना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे, उद्योजक रजनीकांत कोठारी,उद्योजक अमित भाटीया यांच्या हातून देण्यात आले. या प्रसंगी भरारी फाऊंडेशनचे दिपक परदेशी, रितेश लिमडा, दिपक विधाते, सचिन महाजन उपस्थित होते.

सीव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना पिपिई कीट घातल्याशिवाय हॉस्पिटलच्या आवारात यायला परवानगी नाकारण्यात आली आहे. यामुळे रुग्ण नातेवाईकांच्या इमर्जन्सी कामासाठी जाणे शक्य नव्हते. ही गैरसोय दूर करत ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची हलाकिची परिस्थिती आहे किवा ते पिपिई कीट विकत घेऊ शकत नाही अशा रुग्नाच्या 60 नातेवाईकांनाभरारी फाऊंडेशन व के के कॅन्स मार्फत  पिपिई कीट वितरित करण्यात  आले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज