यावल येथे नवीन अंत्योद्‌य शिधापत्रिका वाटप

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथील जागतीक अपंग दिनानिमित्ताने तालुक्यातील अपंग कुटुंब प्रमुखांना पुरवठा विभागाच्या माध्यमातुन अंत्योदय शिधापत्रीकांचे वाटप तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३२ अपंग बांधवांना  शिधापत्रीका देण्यात आल्या.

सविस्तर असे की, यावल येथे आयोजीत तहसीलदार यांच्या कार्यालयात आज दुपारी जागतीक अपंग दिनानिमित्त तालुक्यातील गोपाळ खाचणे, सुभाष सोनवणे, पंडीत पाटील, शंकर खाचणे, जिजाबाई सोनवणे, मिनाबाई बऱ्हाटे, जितेन्द्र कपले, मनिषा खाचणे, पोपट चौधरी, सोमेश सोनवणे, दत्तात्रय चौधरी, सतिष सोनवणे, गणेश भारंबे, कल्पना चौधरी, सुहासनी चौधरी, हसन तडवी, फारूकी नसीरोद्दीन, संजय वानखेडे, प्रभाकर सोनार, ललीत वाघुळदे अशा एकुण ३२ अपंग बांधव व भगीनींना शासनाच्या अंत्योदय योजने अंतर्गत धान्य मिळावे, या करीता यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या प्रयत्नातुन शिधापत्रीका वाटप करण्यात आली असुन या योजनेअंतर्गत प्रत्येक शिधापत्रीका धारक लाभार्थ्यांस ३५ किलो धान्य मिळणार आहे.

या प्रसंगी यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांच्यासह आदी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -