fbpx

खा. रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त औषधांची वाटप

रावेर लोकसभा मतदारसंघातील लोक प्रिय खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश नारीशक्ती अध्यक्ष व भाजप कार्यकर्त्यां दिपाली चौधरी झोपे यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे औषधे वाटप करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज एम तडवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

सर्वत्र थैमान घालणा-या कोरोना विषाणुसंसर्गाच्या संकटकाळी रुग्णांचे उपचार करताना औषधे तुटवडा निर्माण झाला असून नाँन कोवीड रुग्णांवर उपचार करण्यास आरोग्य यंत्रणा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंन्दाच्या माध्यमातून गोरगरीब परीस्थिती असलेल्या रूग्णांना उपचारासाठी मदत व्हावी या सामाजिक व विधायक उद्देशाने फैजपुर येथील खान्देश नारीशक्ती ग्रुप अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य दिपाली चौधरी झोपे यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज एम तडवी याच्या कडे अँन्टीबायोटीक इंजेक्शन सलाईन तसेच शक्तिवर्धक इंजेक्शन असे विविध प्रकारचे औषधे  स्वखर्चाने विकत घेऊन दिली आहे. या प्रसंगी पार पडलेल्या या कार्यक्रमास दिपाली चौधरी झोपे यांच्यासह प्रतिभा ठाकूर मॅडम युवा कार्यकर्त्यां कु. जाग्रुती जी भोळे जर्नलीस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील सिस्टर पुनम गावडे आशा स्वयंसेविका सुरेखा धनगर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

mi advt

दरम्यान या अतिशय प्रतिकूल आशा परिस्थितीत गरजू रुग्णांना उपचारासाठी मदतीची गरज असताना दिपाली चौधरी यांनी औषधीचे मदत दिल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा येथील वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी तसेच रूग्णांना देखील खान्देश नारीशक्ती ग्रुप चे आभार मानले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज