fbpx

श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजतर्फे पूरग्रस्तांना साहित्य वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव तालूक्यातील पाटखडकी व रायगड जिल्ह्यातील मांगवली आदीवासी वाडी येथे अतिवृष्टीमुळे पूरपरीस्थिती निर्माण होऊन पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते. अशा पूरग्रस्त कुटूंबांना अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज युवा आघाडीतर्फे किराणा साहित्य, चादर, चटई, साडी, ड्रेस यासारखे संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

युवा आघाडीचे अध्यक्ष प्रमोद शिंपी, सचिव गणेश निकुंभ व कार्यालयप्रमुख रुपेश पवार यांचे हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाकरीता युवा आघाडीने शिंपी समाजाला आवाहन करुन महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमधून पूरग्रस्त निधी जमा केला होता. औरंगाबाद,अहमदनगर व जळगाव या जिल्ह्यांतून पूरग्रस्तांकरिता भरघोस निधी मिळाला. पूरग्रस्तांना मदत देण्याकरीता समाजातील मान्यवर, समाज पदाधिकारी यांचेकडून आर्थिक व वस्तूस्वरूपात योगदान मिळाले. या उपक्रमाकरिता युवा आघाडीचे उपाध्यक्ष अजय जाधव, सहसचिव संदिप सोनवणे, औरंगाबाद जिल्हा युवाध्यक्ष प्रमोद कापडणे, नगर जिल्हा युवाध्यक्ष निखील पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष प्रदीप भांडारकर, जितेंद्र खैरनार, माणगाव (जि.रायगड) येथील विजय ईसई व रविंद्रकुमार बोरसे आदींनी सहकार्य केले. युवा आघाडीच्या या अभिनव उपक्रमाचे अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रबाबा बागुल व विश्वस्त मंडळाने कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज