बचतीच्या पैशातून बालगृहात केले फराळाचे वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२१ । आई-वडील, नातेवाईकांकडून मिळणाऱ्या पैशांची बचत करून व त्या बचतीच्या पैशातून खडके बु. येथील अनाथ, निराधार मुला-मुलींच्या बालगृहात दिवाळीनिमित्त फराळ वाटप करून आयुषी साळुंखे हिने अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.

शेंदुर्णी येथील उपप्राचार्य डॉ. शाम साळुंखे व प्रिती साळुंखे यांची मुलगी आयुषी हिने तिचा वाढदिवस नुकताच अनोख्या पद्धतीने साजरा केला. तिला मिळणाऱ्या पैशांची बचत करून व या बचतीच्या पैशातून तिने एरंडोल तालुक्यातील खडके बु. येथील कै.यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अनाथ, निराधार व निराश्रित मुला-मुलींच्या बालगृहात दिवाळीनिमित्त शंकरपाळे, बर्फी, शेव चिवडा व नमकिन आदी फराळचे वाटप केले. त्यासाठी तिने ३ रुपयांची बचत केली होती.

एकाचवेळी मिळविले दोन पुरस्कार
आयुषी हिला राष्ट्रीय कला गौरव आणि राष्ट्रीय कलारंग हे दोन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. तिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थाचालक भुषण पाटील यांनी तिचे विशेष कौतुक केले. यावेळी आयुषी हिचे वडील डॉ. शाम साळुंखे, आई प्रिती साळुंखे यांसह प्रमोद पाटील, गणेश पंडीत, ॠषीकेश ठाकरे, अधिक्षक मधुकर कपाटे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज