मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशनतर्फे ब्लॅंकेट वाटप

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरात काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशनतर्फे शहरात विविध ठिकाणी अपंग व गरजू वृद्धांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशनतर्फे शहरातील चिमुकले राम मंदिर, नवसाचा गणपती मंदिर, गणेश कॉलनीतील दत्त मंदिर, नवीन बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन, सिंधी कॉलनी आदी परिसरातील अपंग, गरजू वृद्धांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी सद्या वाढते थंडीचे प्रमाण पाहता शहरातील विविध सामाजिक संस्था, समाजसेवकांनी गरीब, गरजू, अपंगांना मायेची ब्लँकेट रुपी उब द्यावी, असे आवाहन मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले.

यावेळी गरजू आजी, बाबा यांच्या चेहऱ्यावर ब्लॅंकेट मिळाल्याने आनंद दिसून आला. मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, प्रगती शाळेचे आदर्श शिक्षक मनोज भालेराव, फाऊंडेशनचे सदस्य सादिक शेख, सदस्य मोनाली कुमावत, गणेश जोशी, लोकेश सोनार, सोपान वराळे, नूतन मराठा कॉलेजचे प्रा.भगतसिंग पाटील आदींचा हस्ते या ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पवार, चोपडा येथील आदर्श शिक्षक अब्दुल सरदार पटेल यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -