नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वावर फळ वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । सावदा येथे स्व. सुमन बाबुराव चौधरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला. सविस्तर वृत्त असे की सावदा येथील ८ वर्षापासून कार्यरत असलेली स्व. सुमन बाबुराव चौधरी बहुद्देशीय संस्थेमार्फत सुश्रुत हॉस्पिटल, सुश्रुत एक्सिडेंट हॉस्पिटल तसेच स्वामी हॉस्पिटलमध्ये नवरात्रीच्या पावन पर्वावर बाळंत झालेल्या महिलांना तसेच इतर सर्व पेशंटला फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनीता वारके, आणि डॉ. अविनाश बऱ्हाटे, अस्थी रोग तज्ञ डॉ. उमेश पिंपळे यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सारिका चौधरी तसेच सचिव राजेश चौधरी (राज सर) उपस्थित होते या फळवाटप कार्यक्रमास अमूल्य असे सहकार्य सावदा नगरपरिषदेचे कर निरीक्षक अनिल आहुजा यांचे लाभले त्याचप्रमाणे सावदा दुर्गा केबल नेटवर्कचे श्री किशोर परदेशी तसेच पत्रकार तथा प्रेशियस कॉम्प्युटरचे संचालक प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज