⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | २४ तासांत धान्य वाटप करा, अन्यथा..

२४ तासांत धान्य वाटप करा, अन्यथा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । तोंडावर दसरा, दिवाळी यासारखे ऊत्सव येऊन ठेपले असतांनाच धान्य उपलब्ध असून देखिल पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील गोरगरीब जशतेला हक्काचे धान्य अद्यापपर्यत वाटप केली जात नसल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, येत्या २४ तासात धान्य वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

मुक्ताईनगर तालुका पुरवठा विभागाचा अतिशय भोंगळ कारभार सुरू असुन स्वस्त धान्य दुकानांवर पुरवठा वाहतुक कंत्राटदार व पुरवठा अधिकारी व कर्मचारी यांचे अर्थपूर्ण साटेलाटे असल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून धान्य पोहचले नाही.दसरा दिवाळीसारखे महत्त्वपुर्ण सण तोंडावर असतांना देखिल अद्यापर्यत धान्य दुकानांवर धान्य पुरवठा केला जात नाही.जिल्हाभरात धान्य उपलब्ध असतांना पुरवठा विभागातील गलथान कारभारामुळे अन्न सुरक्षा योजनेतील गोरगरीब जनतेला धान्यांपासुन वंचित रहावे लागत असल्याची स्थिती आहे. दरम्यान येत्या २४ तासांत धान्य वाटप सुरु न केल्यास सेनास्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख छोटुभोई, उपतालुकाप्रमुख प्रफुल्ल पाटील,संघटक अफसर खान,शहर प्रमुख गणेश टोंगे,राजेंद्र हिवराळे,गोपाळ सोनवणे,संतोष मराठे,संतोष माळी,शकुर जमादार,मुशीर मनीयार,शकील मेंबर,साजिद खान,अनिकेत भोई,पिंटु पाटील, अविनाश अकडमोल या़च्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह