fbpx

Breaking : ‘त्या’ २७ नगरसेवकांवर होणार अपात्रतेची कारवाई

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२१ । जळगावच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना धडा शिकविण्यासाठी भाजपाने तयारी केली आहे. पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरवावे यासाठी आज नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करण्यात आले असल्याची माहिती गटनेते भगत बालाणी यांनी दिली आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपाचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवक पद करण्यात यावे याकरता जळगाव मनपा भाजपा गटनेता भगत बालाणी यांनी आज दुपारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली.

शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्यानंतर या नगरसेवकांना भाजपाने प्रत्यक्ष, मोबाईल, व्हाट्सअप, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा प्रकारे पक्षादेश बजावला होता मात्र त्याचे उल्लंघन केल्याचा भाजपाचा आरोप आहे. २७ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी भाजपकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज