विनामास्क असताना पोलिसांशी हुज्जत नडली, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२२ । टॉवर चौकातून दुचाकीवर जात असलेल्या दाम्पत्याला शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता शहर पोलिसांनी विनामास्क असल्याने हटकले. त्याचा राग आल्याने लोकांकडे खाण्यासाठी पैसे नाहीत. पोलिस वाळूचे पैसे घेतात, असे आरोप करून उपोषणाला बसणार असल्याचे सांगत दाम्पत्याने हुज्जत घातली.

पोलिस ठाण्यात व्हिडिओ शूटिंगही केले. याप्रकरणी दांपत्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पतीला अटक केली असून, त्यांच्यासोबत लहान मुलगा असल्याने पत्नीला घरी जाऊ दिले. पत्नीलाही पोलिस अटक करणार आहे.
नारायण प्रकाश जगताप (वय ३६, रा. खोटेनगर) व त्यांची पत्नी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी १० वाजता टॉवर चौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई व नाकाबंदीसाठी पोलिस उपनिरीक्षक जगदीश मोरे, जमशेर तडवी, अानंदा राठोड, ललित भदाणे, प्रफुल्ल धांडे यांची नेमणूक केेली होती. सकाळी ११.१५ वाजता एमएच-१९-बीडब्ल्यू-८२०२ या क्रमांकाच्या दुचाकीवरील वाहनचालकास पोलिसांनी थांबवले. दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेल्या महिलेनेही तोंडावर मास्क लावलेला नव्हता. त्याबाबत पोलिसांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी पाेलिसांशी हुज्जत घातली.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -