fbpx

पंचमुखी हनुमान मंदिराजवळ वाद, भररस्त्यावर दगडफेक

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२१ । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बुधवारी दुपारी ५.३० च्या सुमारास दोन तरुणांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने भर रस्त्यावर दगडफेक करण्यात आल्याने नागरिक भयभीत झाले होते. दरम्यान, एका तरुणाचे डोके फुटले असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंचमुखी हनुमान मंदिराजवळ बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास दोन तरुणांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये हाणामारी होत असताना बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी एका तरुणाच्या नातेवाईकांना याबाबत माहिती कळताच त्यांनी धाव घेत वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याने रस्त्यावरच दगडफेक करण्यात आली. मारहाणीत गोकुळ उर्फ सागर बबन लोंढे रा.कंजरवाडा हा तरुण डोक्याला दुखापत झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाल्याने नागरिकांनी आपापली दुकाने बंद करून घेतली होती. शोभा हॉस्पिटल समोरच हा प्रकार घडला असून पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा वाद टळला आहे. पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याचे समजते.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज