fbpx

जळगावातील शिवकॉलनी चौकात चिकन विक्रेत्यांमध्ये वाद, एकमेकांवर कोयत्याने वार

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२१ । शहरातील शिव कॉलनी परिसरात असलेल्या हॉटेल चिनार गार्डन समोर चिकन विक्री करणाऱ्या दोन्ही विक्रेत्यांमध्ये मंगळवारी सकाळी हा वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने दोघांनी एकमेकांवर वार केले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिव कॉलनी परिसरात हॉटेल चिनार गार्डन जवळ काही चिकन विक्रेते चिकन विक्रीसाठी स्टॉल मांडून बसतात. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास जळगाव चिकन सेंटर आणि लालूभाऊ चिकन सेंटरच्या विक्रेत्यांमध्ये वाद झाला. वाद वाढल्याने दोघांनी शस्त्रे हातात घेतले आणि एकमेकांवर वार केले.

या घटनेत सद्दाम खाटीकच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे तर इम्रान खाटीकच्या हाताला दुखापत झाली आहे. दोघांना रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहोचले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज