अखंड भारत सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी डिगंबर सोनवणे

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । जिल्हा अखंड भारत सेनेच्या कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष व सचिवांच्या मार्गदर्शनाखाली घोषित करण्यात आली.त्यात जिल्हा अध्यक्षपदी दिगंबर मुरलीधर सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सुवर्ण चांदेलकर तर प्रधान महासचिव म्हणून कविता सपकाळे यांची निवड करण्यात आली आहे.

अखंड भारत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आलोक राणा, राष्ट्रीय सचिव निलेश पारेख, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू वैष्णव, महासचिव सुषमा सिंग, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष वैशाली सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अखंड भारत सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात करावी. महिला व बालकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, नागरी प्रश्नांचा देखील अभ्यास करून अखंड भारत सेनेच्या माध्यमातून काय योगदान देता येईल याबाबतची माहिती त्यांनी दिली.

यांची निवड 

यानंतर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी दिगंबर मुरलीधर सोनवणे, वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सुवर्णा चांदेलकर, प्रधान महासचिव म्हणून कविता सपकाळे यांची निवड करण्यात आली. यासह उपाध्यक्ष म्हणून कीर्ती वारके, संगीता पाटील, शालू जाधव, वैशाली वाघुळदे, महासचिव म्हणून आशा भावसार, सुरेखा पाटील, सविता भवर, मिलिंद महाजन यांची निवड झाली. तसेच कोषाध्यक्ष म्हणून कविता इंगळे, वरिष्ठ प्रवक्ता म्हणून वासुदेव पाटील, सोशल मीडिया प्रभारी म्हणून तृप्ती पाटील, वरिष्ठ सचिव म्हणून माधुरी कोल्हे, सचिव उज्वल सिंघवी, पल्लवी पाटील, मनीषा पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रदेश सभासद आशा डेमाळे, प्रदेश युवा मोर्चा पदाधिकारी लीना पाटील आणि स्वप्नील भावसार उपस्थित होते. दरम्यान, आगामी काळात आश्वासक कार्य करून अखंड भारत सेनेला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल असे यावेळी कार्यकारिणीच्या वतीने सांगण्यात आले. जिल्हा कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -