धरणगाव न्यायालयाचा कामधेनु गो-शाळेला पशुधन देण्याचा आदेश रद्द

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । जळगाव येथील अतिरिक्त सञ न्यायाधीश डि.एन.खडसे यांनी धरणगाव न्यायालयाचा कामधेनु गो-शाळेला पशुधन आदेश रद्द ठरवुन गुरांच्या मालकांना पशुधन देण्याचे आदेश पारीत केले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०जुलै२०२१ रोजी बकरीद दिवशी धरणगाव पोलिस स्टेशन चे अंबादास मोरे व इतर कर्मचार्यांना शे.रफीक शे. मुसा, जमिल अहमद खान,शेख शरीफ मुसा सर्व रा. धरणगाव यांच्या ताब्यात २० गुरे(पशुधन) आढळुन आली.

त्यानुसार संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल होऊन सर्व गुरे कामधेनु गो-शाळा धरणगाव यांच्या ताब्यात देण्यात आली. शे.रफीक शे.मुसा वगैरेंनी पशुधनाचे कायदेशिर मालक म्हणुन पशुधन ताब्यात देण्याचा रितसर आदेश प्राप्त करण्यासाठी धरणगाव न्यायालयाकडे विनंती अर्ज केले न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग धरणगाव एस.डी.सावरकर यांनी अर्ज नामंजूर करून जप्त केलेले वळू कामधेनु गो-शाळा धरणगाव यांच्या ताब्यात व कब्जात देण्याचा आदेश केला.

धरणगाव न्यायालयाच्या आदेशाविरूध्द शे.रफीक शे.मुसा वगैरेंनी जिल्हा व सञ न्यायालय जळगाव यांच्याकडे फौजदारी रिव्हीजन अर्ज दाखल केले. अतीरीक्त सञ न्यायाधीश डि.एन.खडसे यांनी तीनही फौजदारी रिव्हीजन अर्ज मंजूर करून धरणगाव न्यायालयाचा पशुधनाचा आदेश रद्द ठरवुन शे.रफीक शे.मुसा वगैरेंना २० वळूंचा ताबा देण्याचा आदेश पारीत केला. शे.रफीक शे.मुसा वगैरेंकडून अँड. मोहन शुक्ला यांनी कामकाज पाहीले त्यांना अँड सुजीत पाठक यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar