fbpx

यावल नगरपरिषदच्या उपनगराध्यक्षपदी सौ.देवयानी महाजन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२१ । यावल येथील नगर परिषदच्या उपनगराध्यक्षपदी सौ. देवयानी गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे. दिनांक २४ मे रोजी सकाळी ११ वाजता यावल नगर परिषदच्या सभागृहात ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या उपनगराध्यक्षपदा साठीच्या सर्व साधारण सभेच्या पिठासिन अधिकारी म्हणुन तहसीलदार महेश पवार हे होते. तर मुख्यधिकारी बबन तडवी यांच्यासह त्यांना नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी विजय बडे, अभीयंता योगेश मदने, रमाकांत मोरे यांनी सहकार्य केले.

यावेळी यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्ष सौ . पौर्णिमा राजेन्द्र फालक यांनी नगराध्यक्ष सौ. नौशाद मुबारक तडवी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान या रिक्त झालेल्या जागेवर नगरसेविका सौ. देवयानी गिरीश महाजन यांचा उपनगराध्यक्षपदा करीता एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सौ. देवयानी महाजन यांच्या उमेदवारी अर्ज सुचक नगर परिषदचे गटनेते अतुल वसंत पाटील हे होते.

तर अभीमन्यू विश्वनाथ चौधरी हे अनुमोदक होते. सौ. देवयानी महाजन यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड संपुर्ण प्रक्रीयेत नगराध्यक्ष सौ. नौशाद तडवी यांनी सहभाग घेतला. सौ. देवयानी महाजन यांची निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष सौ. नौशाद तडवी, गटनेते अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश पोपटराव येवले, माजी उपनगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते, सामाजीक कार्यकर्ते गिरीश महाजन आदींनी त्यांना शुभेच्छा देवुन स्वागत केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt