जळगावचा देवेश भय्या करणार दुबईत प्रतिनिधित्व

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ ।  १२ ते २१ डिसेंबर दरम्यान, दुबई येथे होणाऱ्या इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलम्पियाडमध्ये जळगावचा देवेश भय्या हा विद्यार्थी देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. देशातून सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यात त्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातून देवेश हा एकमेव विद्यार्थी आहे.

पात्रता, लेखी व प्रात्याक्षिक या तीन परीक्षांमधून लाखो विद्यार्थ्यामधून अंतिम ३५ आणि त्यातून या सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. देवेश हा आर्किटेक्ट पंकज भय्या व इंटेरियर डिझायनर पल्लवी भय्या यांचा मुलगा असून, एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी आहे.

यांचे मार्गदर्शन लाभले

त्याला शाळेचे संचालक जितेंद्र पाटील, कृणाल राजपूत व प्राचार्य शिल्पा मल्हारा यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज