उपमहापौर हल्ला प्रकरणी दोघांना २९ पर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर रविवारी रात्री गोळीबार झाल्याच्या घटनेने जळगावात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी उमेश पांडूरंग राजपूत (पाटील वय-२८) व किरण शरद राजपूत (पाटील वय-२४) या दोघांना काल सोमवारी रामानंद नगर पोलीसांनी अटक केली असून आज मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोघांना २९ जुलै पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली.

याबाबत असे की, रविवारी रात्री पिंप्राळा येथील कुलभूषण पाटील यांच्या घरावर गोळीबार केला. यात ते सुदैवाने बचावले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी कुलभूषण पाटील यांनी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार महेंद्र राजपुत,उमेश राजपुत. मंगल राजपुत आणि बिर्‍हाडे (पुर्ण नाव माहीत नाही) सर्व रा. पिंप्राळा परिसर यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले होते.

यातील दोन संशयित आरोपी उमेश पांडूरंग राजपूत आणि किरण शरद राजपूत रा. पिंप्राळा जळगाव यांना रामानंद नगर पोलीसांनी काल सोमवारी जामनेर तालुक्यातील मालखेडा येथून अटक केली होती. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची म्हणजे २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. संदीप परदेशी करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -