हद्दपार असलेला गुन्हेगार चाळीसगाव पोलिसांच्या जाळ्यात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच आगामी काळात येणारा गणेशोत्सव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व इतर सणांच्या पार्श्‍वभूमीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, या शहरांमधून दोन वर्षासाठी हद्दपार असलेला आरोपी चाळीसगावातील लक्ष्मीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवीत असताना त्याच्या स्वतःच्या घरी मिळून आला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव पोलिसांनी शहरातील लक्ष्मीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवले होते. तर त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये रात्री एक वाजता पाच जिल्ह्यांमधून हद्दपार असलेला आरोपी अक्षय पाटील हा आपल्या घरात मिळून आला. सदर आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन त्याच्यावर हद्दपार आदेशाचा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक के.के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनवणे, विनोद भोई, विजय पाटील,यांनी केली

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar