राजू सूर्यवंशींसह ८ जणांच्या हद्दपारीचे आदेश रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरातील पंधरा बंगला भागातील रहिवासी व रिपाइंचे (आठवले गट) ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह ८ जणांच्या हद्दपारीचे आदेश अखेर रद्द करण्यात आले आहे. यामुळे सूर्यवंशी गुरुवारी पुन्हा शहरात दाखल झाले.

यांचा आहे समावेश

राजू सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, राेहन राजू सूर्यवंशी, शेख इम्रान शेख गुलाम रसूल, किशाेर भागवत सूर्यवंशी, कैलास भागवत सूर्यवंशी, आनंद भागवत सूर्यवंशी आणि हर्षल कैलास साेनार (सर्व रा.भुसावळ) – यांना पोलिस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंडे यांनी १८ ऑगस्ट २०२१ रोजी जळगाव जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार केले हाेते.

या आदेशाविरूद्ध सूर्यवंशी यांनी नाशिक येथे महसूल आयुक्तांकडे अपील दाखल केले. त्या अपिलावर दाेन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी पोलिस अधीक्षकांनी काढलेले हद्दपारीचे आदेश आदेश रद्द केले. त्याची प्रत सूर्यवंशी यांना प्राप्त झाली. ही प्रत त्यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली. न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. तेथे मला न्याय मिळाल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. सूर्यवंशीसह आठही जण गुरुवारी भुसावळात घरी परतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज