fbpx

परिवहन विभागाचा ऑक्टोबर महिन्याचा तालुकानिहाय दौरा जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२१ । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत ऑक्टोबर महिन्याचा तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात आला असून याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

ऑक्टोबर-2021 चे शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक, दौऱ्याचे ठिकाण

mi advt

अमळनेर-पहिला व चौथा मंगळवार, जामनेर-दुसरा बुधवार, पाचोरा-पहिला सोमवार, भुसावळ-पहिला, दुसरा व चौथा गुरुवार, धरणगाव-चौथा सोमवार, चाळीसगाव-पहिला, दुसरा व चौथा शुक्रवार, यावल – तिसरा सोमवार, सावदा – पहिला बुधवार, चोपडा – दुसरा सोमवार, रावेर – दुसरा मंगळवार, बोदवड – तिसरा बुधवार, भडगाव – पाचवा शुक्रवार, पारोळा – तिसरा गुरुवार, मुक्ताईनगर- चौथा बुधवार याप्रमाणे दौरा राहील.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज