देवकर रुग्णालयाचे अभियान, सलग दुसऱ्या गुरुवारी २१ मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२१ । गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात सलग दुसऱ्या गुरुवारी 21 रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम करण्यात आला. पुढील गुरुवारी देखील 21 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

रुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मोफत नेत्र तपासणीसाठी दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. तसेच रुग्णांकडून या महाअभियानाचे कौतुक केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे अभियान राबविले जात असून यात 2500 रुपयात मोतीबिंदू व 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे.

तपासणी पूर्णपणे मोफत

या महाअभियानांतर्गत ना नफा ना तोटा तत्त्वावर अभियान राबविले जात असल्याने डोळ्यांची तपासणी व रुग्णाच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी आवश्यक सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहेत. यापुढेही डोळ्यांची समस्या असलेल्या रुग्णांनी गुरुवारपूर्वीच मोफत पूर्वतपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. रुग्णांनी डॉ. नितीन पाटील मो नं. 9422977071 व 7507724200 यावर संपर्क साधावा.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -