यावल तालुक्यात डेंग्युचा आजार वाढतोय ; चितोडा ग्रा.पं.कडून गावात जंतुनाशक औषधींची फवारणी करण्याची गरज

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ । यावल तालुक्यातील ग्रामीण परिसरात डेंग्युचा आजार हा वेगाने वाढत आहे. नागरीकांसह आरोग्य यंत्रणेला अधिक सज्ज व दक्ष राहावे लागणार आहे.

दरम्यान, चितोडा येथील ग्रामपंचातने दक्षता घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत पातळीवर गावात स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. ते होत नाही. त्यामुळे डेंग्यु वाढण्यात कारणीभूत ठरू शकते. ग्रामपंचायतने जंतुनाशक औषधींची नियमीत फवारणी केली पाहिजे. सर्वात जास्त धोका नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकाना आहे. कारण अद्यापही ग्रामपंचायतकडून नाले सफाई होत नसल्याची ओरड नेहमीच होते.

परंतु आता तालुक्यात डेंग्युचा वाढता आजार लक्षात घेता ग्रामपंचायतने गावातील साफसफाई करणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील घरामध्ये तसेच परिसरात स्वच्छता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या कोरोना महामारी अजूनही गेली नसल्याने त्यांचे देखील पालन करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. कोरोनानंतर आता यावल तालुक्यात डेंग्यु हळूहळू आपले हातपाय पसरवित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतसह गावातील नागरिकांनी दक्षता घ्यावी.

डेंग्यूची लक्षणे

ताप, डोके दुखणे, सांधे दुखणे, उलट्या, मळमळ

डोळ्यांच्या खोबणीत दुखते, हे डेंग्यूचे वैशिष्ट्य आहे.

धोक्‍याची लक्षणे

अंगावर लाल पुरळ येणे.

शरीराच्या कोणत्याही भागातून उदा.- हिरड्या, नाक आदी, रक्‍तस्राव होणे.

डेंग्यूचे प्रकार

डेंग्यूचे दोन प्रकार पडतात. ज्यामध्ये पहिला प्रकार हा साधा डेंग्यू असतो तर दुसरा प्रकार हा जीवघेणा ठरू शकतो.

पहिला प्रकार : फिव्हर डेंग्यू ः यामध्ये सामान्य व्हायरल फिव्हरसारखा ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे दिसतात.

दुसरा प्रकार ः या प्रकारात परत दोन प्रकार पडतात. ते म्हणजे डेंग्यू शॉक सिंड्रोम व डेंग्यू  हेमोरेजिक फिवर. हे डेंग्यू अधिक धोकादायक असतात.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -