सावदा न.पा.चे नवीन सभागृह लेवा समाजाकडे हस्तांतरीत करण्याची मागणी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । सावदा नगरपालिकेच्या कोचुर रोडवरील सभागृहामागे असलेल्या गट नं ६४९/६५० मध्ये बांधण्यात आलेले नवीन सभागृह लेवा पाटीदार समाजाकडे त्वरीत हस्तांतरीत करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

सावदा नगरपालिकेकडून नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या एकूण जागेपैकी २० आर जागा ही लेवा समाजास देण्यात आली होती, मात्र दि.१९ ऑगस्ट २०१४ रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गट नं ६४९/६५० वर सभागृह बाधण्याबाबत चर्चा होऊन या जागेवर पालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सभागृह बांधावे व ते लेवा समाजास हस्तांतरीत करावे. सभागृह लेवा समाजास हस्तांतरीत झाल्यावर त्या २० आर जागेवर लेवा समाजाचा हक्क राहणार नाही, असे ठरले होते. या ठरावावर सूचक म्हणून तात्कालीन व विद्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी तर अनुमोदक म्हणून स्व. नगरसेवक प्रभाकर महाजन हे होते.

दरम्यान, सभागृह बांधण्यात आले असून ते खुले करून ठरावानुसार लेवा समाजाकडे देण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर शरद भारंबे, महेश भारंबे, भरत नेहेते, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, सागर पाटील, शाम पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, शिरीष चौधरी, माजीमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हाधिकारी जळगाव व फैजपूर प्रांताधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -