fbpx

खडकी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामांच्या चौकशीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । स्वच्छ भारत अभियानातंर्गत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असून आज रोजी त्याचा वापर होत नाही, तरी स्वतः पाहणी करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी खडकी ता. जामनेर येथील रहिवाशी श्रीधर नाईक यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. तसा तक्रार अर्जही त्यांच्याकडून देण्यात आला आहे.
श्री. नाईक यांच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारी अर्जात, स्वच्छ भारत अभियानातंर्गत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले असून आज रोजी त्याचा वापर होत नाही, तरी स्वतः पाहणी करून चौकशी करण्यात यावी, दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत झालेल्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी, १४ व्या वित्त आयोगामध्ये झालेली कामे हि निकृष्ठ दर्जाची झालेली असून त्यावर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी, ग्रामनिधीमध्ये झालेल्या कामाची व केलेल्या खर्चाची व त्यावर टाकलेल्या व्हाऊचरची चौकशी करण्यात यावी तसेच झालेला वसूल वेळोवेळी बँकेत भरणा न करता वरच्या वर खर्च झालेला आहे, याची सुद्धा चौकशी करण्यात यावी, १४ व्या वित्त निधीमध्ये खडकी व बोरगाव येथे पिण्याच्या पाण्याचा आर.ओ बसविला असून इतका खर्च करून सुद्धा आर.ओ. बंद आहे याची चौकशी करण्यात यावी, १४ व्या वित्त आयोगामधून झालेल्या प्लेव्हर ब्लॉकची कामे निकृष्ठ दर्जाची झाली असून त्याची चौकशी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, गावात घाणीचे साम्राज्य असून गटारींमध्ये पाणी तुंबलेले आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यामध्ये टीसीएल पावडर वेळोवेळी टाकले जात नाही, सर्व कामाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या तक्रारी अर्जात करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज