fbpx

बोरखेडा खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी केलेल्या मनमानी कारभारातून लाखो रुपयांचे गैरव्यवहार केल्याप्रकरणी तक्रार ग्रा.पं. सात सदस्यनी गटविकास अधिकारी जि.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि सात सदस्य आहे सात सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगातून १९ फेबुवारी २०२१ ते २४ एप्रिल २०२० दरम्यान सर्वसाधारण त सभा कोरम पूर्ण करण्यासाठी असतांना तहकूब करून मनमानी कारभार केला. शासकीय निधीतून मोठा अर्थिक भ्रष्टाचार आणि लिखित तक्रार ११ आँगस्ट २०२० रोजी सात सदस्यांनी केली आहे.

तक्रारीत म्हटल्या प्रमाणे १९ फेब्रुवारी २०१९ ते २४ एप्रिल २०२० दरम्यान १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून व ५ टक्के अबंध निधीतून मागील अडीच वर्षाच्या कालावधीत सरपंच उपसरपंच तथा ग्रामसेवक यांनी वरील कालावधीत सर्वसाधारण कोरम पूर्ण असतांना ही तहकूब करून मनमानी कारभार करून संगनमताने शासकीय निधीत मोठा आर्थिक भ्रष्टाचार व गैरव्यवहार केला त्यात कामे व त्यासाठी झालेली पुढील प्रमाणे.

विहीर खोदकाम खर्च ४३ हजार एलईडी लाईट ९९ हजार ९८८,नविन पाईपलाईन २ लाख रुपये, जिल्हा परिषद संरक्षण भिंत २ लाख रुपये, फेव्हर ब्लाँक खर्च १लाख ८५ हजार रुपये, ग्रापंचात कार्यालय दुरूस्ती ७१ हजार रुपये अंगणवाडी अँक्वागार्ड व गणवेश खर्च १ लाख रुपये, कोरोनाच्या पाशर्वभुमीवर सँनेटाईजर मास्क, आक्झेमिटर खरेदी १ लाख ९ हजार ९५० हजार खर्च याशिवाय गाव पातळीवर आपले सरकार सेवा केंद्र १० टक्के रक्कमेनुसार २ लाख ५५ हजार २३४ रूपये अशा प्रकारे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले.

यासीवाय ग्रामपंचायत मालकीचे शेतजमीन शेत स्वामित्व रक्कम जमा करून ग्रामपंचायतीने वर्ष २०१८ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ग्रामपंचायत मालकीचे शेताचा १ लाख ३० हजार प्रति वर्ष प्रमाणे तीन वर्षाकरिता ३ लाख ९० हजार रुपये प्रमाणे सदरची रक्कम ही ग्रामपचायतीकडे जमा झालेली नाही या व्यतिरिक्त विद्यमान सरपंच जमशेर तडवी उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने लाखो रुपयांचे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केला असून बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सर्व झालेल्या भ्रष्टाचार आणि गोंधळलेला कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबधीतावर कार्यवाही करावी अशी मागणी सात ग्रामपंचायत सदस्य यांनी केली अाहे.  तक्रारीवर ग्रामपंचायत सदस्य गुलशेर तडवी छब्बीर शेखर तडवी मेहरमान हबीब तडवी आशाबाई मुबारक तडवी नसीबा रशीद तडवी सईदा हमीद तडवी आणि जयश्री सुनिल चौधरी या सात ग्रामपंचायत सदस्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt