fbpx

पिळोदे बु. येथील मयत रेशन दुकानदारच्या वारसास अर्थिक मदतीची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मे २०२१ । यावल तालुक्यातील पिळोदे बु येथील स्वस्त धान्य दुकानदार यांचा मृत्यु झाल्याप्रकरणी त्याच्या या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे 

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूंचा संसर्गाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून यावल तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर कोविड १९ चा प्रसार ग्रामीण भागात रसिकांना दिसुन येत असताना तालुक्यातील मौजे पिळोदे बु येथील स्वस्त धान्य दुकानदार यांचा ही कोरोना संसर्गाची वाहन झाल्याने आजारामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे याकरिता शासनाने त्याच्या कुटुंबीयांना ५०लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी यावल तालुका स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघाच्या वतीने करण्यात आली आहे

या संदर्भात स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघाच्या वतीने आज दिनांक ४ मे रोजी तहसिलदार महेश पवार यांची भेट घेऊन देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की विलास भिका जवरे पिळोदे बु तालुका यावल स्वस्त धान्य दुकान क्रमांक ६४हे अन्न धान्य वाटप करीत असताना कोरोना बाधित झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दिनांक ५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान ते मरण पावले असुन  तरी त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने ५० लाखाची आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून या निवेदनात संघाचे तालुका अध्यक्ष सुनील बाळकृष्ण नेवे तालुका अध्यक्ष शेख रसूल शेख अब्दुल्ला सचिव दिलीप नेवे याच्या स्वाक्षरी आहेत याप्रसंगी जिल्हा परिषद परिषद व पंचायत समिती सदस्य संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे हे उपस्थित होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज