fbpx

चाळीसगावातील बेकायदेशीर होर्डिंग बोर्ड काढून कारवाईची मागणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव शहरातील मुख्य चौकात बेकायदेशीर मोठ-मोठे होर्डिंग कुठलीही परवानगी न घेता लावले जातात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. उच्च न्यायालय यांची होर्डिंग वर बंदी असताना देखील ,मोठमोठे होर्डिंग लावले जातात.

हा न्यायालयाचा अवमान आहे, तसेच होर्डिंग मुळे रोज शहरात छोटे मोठे अपघात घडत असतात. जर आपण बेकायदेशीर होर्डिंग नाही काढले तर, नगरपालिका प्रशासन चाळीसगाव यांच्या विरुद्ध आम्हाला नाईलाजास्तव नगरपालिका विरोधात अवमान याचिका दाखल करावि लागेल. तसेच आपण जर बेकायदेशीर होर्डिंग जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत निषेध म्हणून रोज नगरपालिका चाळीसगाव, यांना मेरा गाव मेरा तीर्थ तर्फे सकाळी 11 वाजता एक होर्डिंग देण्यात येईल.

तरी आपण लवकरात लवकर बेकायदेशीर होर्डिंग काढून शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी मदत करावी ही मागणी मेरा गाव मेरा तीर्थ स्वच्छता अभियान टीम चाळीसगाव यांच्या वतीने उपमुख्य अधिकारी स्नेहल फडतरे यांना विजय शर्मा,खुशाल पाटील,किशोर पाटील निवेदनाद्वारे करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt