शिष्टमंडळांनी केली ‘उर्दू घर’ स्थापन करण्याची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांनी शहरात उर्दूघर स्थापन करण्यात यावे, अशी मागणी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली आहे.

यांची उपस्थिती होती 

या शिष्टमंडळात मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, उर्दू विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एम. इक्बाल, राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख अहमद हुसेन, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मोईनुद्दीन शेख इक्बाल, शिवसेनेचे रईस शेख, एमआयएम महानगरप्रमुख दानिश अमहद, काँग्रेस आयचे महानगराध्यक्ष नदीम काझी, राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख सलीम इनामदार, मुस्लीम सेवा संघाच्या अध्यक्षा फिरोजा शेख, मुस्लीम महिला सेवा संघाच्या महासचिव नसरुन फातेमा, अन्वर खान, काकर बिरादरीचे जिल्हाध्यक्ष रियाज वजीर, फारूक अहेलेकार, सैयद चांद, फिरोज शेख, हाफिज अब्दुल रहीम, सईद पटेल उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज