fbpx

डिफेन्सच्या विद्यार्थ्याला भरारी फ़ाउंडेशन व के.के.कॅन्सचा मदतीचा हात

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२१ । जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका गरजू विद्यार्थी विद्यार्थ्याला पुढील शिक्षणासाठी भरारी फाउंडेशन व के.के.कॅन्सकडून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला आहे. डिफेन्स अकॅडमी औरंगाबाद येथे बारावीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला नुकतेच ५० हजारांची मदत करण्यात आली.

गणेश कॉलनीत राहणाऱ्या प्रणव ज्ञानेश्वर सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या  आठ वर्षांपूर्वी वडीलानी सोडुन दिले असून तो त्याच्या आईसह राहतो. प्रणवची आई एका खाजगी संस्थेत नोकरी करून त्याचे शिक्षण पूर्ण करीत आहे. दहावीला प्रणव ८६% गुणानी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रणवने डिफेन्स अकॅडमी औरंगाबादची अवघड परीक्षा उत्तीर्ण केली.

डिफेन्स अकॅडमीची वार्षिक शैक्षणिक फी जास्त असल्याने त्याला त्यासाठी भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. भरारी फाऊंडेशनचे दीपक परदेशी, के.के.कॅन्सचे रजनीकांत कोठारी, स्पार्क इरिगेशनचे रविंद्र लढ्ढा आणि कृषी उपसंचालक  अनिल भोकरे यांच्या माध्यमातून प्रणवची गेल्या वर्षाची एक लाख रुपये तर चालू वर्षाची ५० हजार रुपयांची फी अदा करण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षाचा मदतीचा धनादेश नुकतेच प्रणवकडे सुपूर्द करण्यात आला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज