fbpx

दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील गुणवंत, गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मदत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२१ ।  कोव्हिड मुळे हाताचे काम सुटले; उपासमारीची वेळ आली. शाळा ऑनलाईन झाली पण ज्या गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत त्यांची शाळा बंद पडली. शिक्षण थांबले, विद्यार्थी निराश झाले. काही विद्यार्थ्यांनी मोबाईल नाही, शाळा करता येत नाही म्हणून आत्महत्या केली.काही विद्यार्थ्यांनी कोरोना मध्ये आपले आई वडील गमावले. अश्या  विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये दीपस्तंभ फाऊंडेशन यांच्या कडून  दीपस्तंभ अक्षय्य शिक्षण अभियान  राबविण्यात आले.महाराष्ट्रातील अनाथ, दिव्यांग, आर्थिक परिस्थिती बिकट असलेले माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दीपस्तंभ फाऊंडेशन तर्फे या अभियानाअंतर्गत मोबाइल, पुस्तके व ट्युशन्स उपलब्ध करून देण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील एकूण 26 विद्यार्थ्यांना काल मोबाईल वाटप करण्यात आले.या प्रसंगी Real Me कंपनीचे अनिल खेमानी , मयूर अपूर्वा , रितेश जैन व या अभियानातील  निवड समितीमधील शिक्षक सदस्य सुनील पवार , दीपस्तंभ फाऊंडेशन चे संचालक राजेंद्र पाटील उपस्थित होते.Real Me कंपनी यांच्याकडून सामाजिक जाणीव जपत या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून कमी दरात मोबाईल व  उपलब्ध करून देण्यात आले.

नगर येथील गणेश वाघमोडे या विद्यार्थ्यांची कोटा येथे सुपर 30 उप्रकमात निवड झाली असून त्याला त्याच्या शिक्षणासाठी लॅपटॉप ची आवश्यकता होती म्हणून संस्थेच्या वतीने त्याला लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात आले.रवींद्र पवार एरंडोल या विद्यार्थ्यांची गुवाहटी आयआयटी मध्ये  निवड झाली असून परिस्थितीमुळे त्याची फिस त्याला भरणे शक्य नव्हते.तरी  दीपस्तंभ फाउंडेशनच्या देणगीदार ठाणे येथील अशीदा इलेक्ट्रॉनिक च्या  आशाताई कुलकर्णी, अनुश्री भिडे , संपदा ताई वागळे यांच्या सहकार्यातून त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.

महाराष्ट्रभरातून विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होते या अर्जांची पडताळणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आर्थिक परिस्थिती नुसार विद्यार्थ्यांना अभियानांतर्गत शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आले. दीडशे विद्यार्थ्यांना मोबाईल, ९५ विद्यार्थ्यांना बारावी, नीट सीईटी , पाठ्यपुस्तके व विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली.५२ विद्यार्थ्याना अकरावी बारावी व विविध प्रवेश परीक्षांची ऑनलाईन ट्यूशन्स उपलब्ध करून दिलीत. यासाठी हाय मीडिया लॅब्रोटरी ठाणे ,रतनलाल सी बाफना ट्रस्ट जळगाव, पगारिया फाउंडेशन, ग्रीन रिसायकल आय टी सेंटर पुणे यांचे सहकार्य लाभले.

महाराष्ट्रातील इतर जिल्हातील निवड झालेल्या विद्यार्थ्याना पुस्तके देण्यात आली असून येत्या 8 दिवसात मोबाईल या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात येतील.अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली. श्री.गौरव महाले, श्री.राम पाटील ,श्री.योगेश शिंपी, श्री  सतीलाल पवार, श्री संजय बारी, श्री. सुनील पवार यांनी या अभियानाचे संचलन केले .

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज