जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून एम.सी. एल. व हार्वेस्ट बायोफ्युएल यांच्या सौजन्याने हत्ती गवत संकलन केंद्र वरणगाव यांच्यामार्फत वरणगाव ते ऑडनस फॅक्टरी वरणगाव रोडावर आपल्या सामाजिक दायित्वाची जाण ठेवत शनिवार १६ रोजी पाणपोईचे लोकार्पण करून सामाजिक उपक्रमांची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास हार्वेस्ट बायोफ्युएल कंपनी चे एम.पी.ओ. दीपक चौधरी व वर्षा चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते एमसीएल कंपनीच्या भविष्यातील वाटचालीबद्दल दीपक चौधरी यांनी मार्गदर्शन केले .त्याचप्रमाणे हत्ती गवतापासून शेतकऱ्यांचा विकास व इंधनातील स्वयंपूर्णतेकडे देशाची वाटचाल यावर देखील मार्गदर्शन केले .
प्रास्ताविक मांडतांना ग्राम उद्योजिका वीणा देशमुख यांनी पृथ्वीवरील जीवनाची उत्पत्ती पाण्यापासून झाली इथपासून सुरुवात करून पाण्याचे शेतीसाठी महत्त्व व सध्याच्या परिस्थितीत पाण्याच्या समस्येबद्दल व त्यावरील संभाव्य उपाय योजनांबद्दल आपले मत व्यक्त केले. या पाणपोई मुळे वरणगाव ते आयुध निर्माणी मार्गावर ये – जा करणाऱ्यासाठी या तप्त उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक रोटे यांनी करताना पाणपोईची जबाबदारी स्वीकारण्याची हमी दिली .