धर्मगुरूंच्या उपस्थितीत मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२१ । फैजपूर शहर व परिसरातील गरजू रुग्णांसाठी माेफत वैद्यकीय मदत म्हणून, दिलेल्या रुग्णवाहिकेचे लाेकार्पण शनिवारी रोजी करण्यात आले. हि रुग्णवाहिका शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या शिक्षक सेनेच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष इलियास असगर शेख व त्यांच्या पत्नी मेहेर निगार शेख यांच्या वतीने त्यांच्या स्व.आई- वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात आली.

यांची उपस्थिती होती 

येथील सुभाष चौकात रुग्णवाहिका लाेकार्पणासाठी सर्व धर्मांच्या धर्मगुरुंच्या उपस्थितीत शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मौलाना ताहेर पटेल हे तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना फतेह मोहम्मद, मौलाना अनस, संत पंथ मंदिराचे जनार्दन हरिजी महाराज, मौलाना शौकत फलाही, मौलाना नोमान, नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक कलीम खान, इरफान मेंबर, सय्यद असगर आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कार्यक्रमाचा उद्देश इलियास शेख यांनी सांगितला. येथील सर्वात ज्येष्ठ मौलाना फतेह मोहम्मद आणि जनार्दन हरिजी महाराज यांच्या हस्ते हिरवीझेंडी दाखवून रुग्णवाहिका रवाना करण्यात आली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज