fbpx

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते अमरधाम स्मशानभूमचे लोकार्पण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१ ।  चोपडा नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रामपुरा भागात पाच कोटी ६८ लाख रुपयांचे अमरधाम स्मशानभूमीचे लोकार्पण १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेत व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या शुभ हस्ते नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत केलेल्या कामांच्या लोकार्पण सोहळा सायंकाळी पार पडला.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आपल्या मनोगतात म्हणाले की , अमरधाम स्मशानभूमीची संकलपना अतिशय उत्तम असल्याचे म्हणाले. स्टेडियम सारखी बैठक व्यवस्था , सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तसेच सामजिक संदेश सुध्दा देण्यात आले आहेत . कोविडच्या दोन्ही लाटांचा मोठा तडाखा जिल्ह्यामध्ये चोपडा तालुक्यास जास्त प्रमाणात बसला आहे . तसेच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे . या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे.

सदर कार्यक्रम प्रसांगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , प्रा अरुणभाई गुजराथी , ॲड संदीप पाटील, मनिषा जीवन चौधरी, जीवन चौधरी, भूपेंद्र गुजराथी, रमेश शिंदे, सीमा अहिरे , सुमित शिंदे  , अनिल गावीत  , अविनाश गांगोडे  , डॉ विकास हरताळकर , चंद्रहासभाई गुजराथी , छंनु झेंडू पाटील, प्रा दिलीपराव सोनवणे, ॲड घनःश्याम निंबाजी पाटील, विरोधी गटनेता महेंद्र धनगर, आशिषभाई गुजराथी , हितेंद्र देशमुख, सुनिल जैन, राष्ट्रवादी पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वच पक्षांचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज