fbpx

पोलीस जनसेवा संघटनेच्या वाचनालयाचे लोकार्पण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ ।  अष्टभुजा देवी कमानीजवळ पेपर वाचनालयाचे आणि अनुपम हौसिंग सोसायटी, पिंप्राळा येथे ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत या कार्यालयाच्या नामफलकाचे अनावर महापौर जयश्री महाजन व समाजसेविका सरिता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे जिल्हा सह सचिव उमाकांत बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व शिवाजी महाराजांच्या पुजनाने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भावेश ठाकूर, प्रमिला बोंडे, पि.डी. बोंडे यांनी केले.

याप्रसंगी ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भावेश ठाकूर, जळगांव जिल्हा अध्यक्ष तिलोत्तमदास (अतुल) बोंडे,  जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील, जिल्हा सचिव निखिल ठाकूर, शहर अध्यक्ष विनय नेहेते, संघटनेचे सदस्य हितेश भावसार, ललित राणे, ऋषिकेश पाटील, अमोल चौधरी व इतर पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज