fbpx

मोठी बातमी : १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता.

परंतु 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.

सरसकट शाळा सुरु करणं योग्य नाही. कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. रिस्क घेऊ नये, असं मत टास्क फोर्सने व्यक्त केके.  काल रात्री उशीरा मुख्य सचिव आणि टास्क फोर्सच्या सदस्यांच्या बैठकीत पार पडली.  या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज