दिवाळी होणार दणक्यात ; जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्री बंदीचा निर्णय मागे

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । ऐन दिवाळीच्या तोंडावर जळगावसह उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे फटाके विक्रेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली होती. दरम्यान, आता हा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत बिनधास्त फटाके फोडता येणार आहे.

दीपाेत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दीपाेत्सवात सर्वाचे आकर्षणाचे केंद्र हे फटाके ठरत असतात. अनेक ठिकाणी हे फटाक्यांचे स्टॊल देखील सुरु करण्यात आले आहे. मात्र, दिवाळीमध्ये सर्वत्र माेठ्या प्रमाणावर फटाके फाेडण्यात येतात. या प्रकारामुळे मात्र माेठ्या प्रमाणावर प्रदूषणात वाढ हाेण्याबराेबर पर्यावरणावरही विपरीत परिणाम हाेतात. याच पार्श्वभूमीवर जळगावसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देशही दिले होते. विशेष सभा घेऊन फटाके बंदीबाबत आपआपल्या विभागांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेशही गमे यांनी दिले होते. राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ योजने अंतर्गत वायू प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पुढाकार घेऊन फटाके विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीनंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे आधिच व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षीही फटाक्यांवर बंदी असल्याने वापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी फटाके बंदीच्या संदर्भात पत्रक काढल्याने व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता उद्भवली होती. फटाके विक्री करुन उदर्निवाह करणाऱ्यांसमोरही मोठे संकट उभं रिहलं होतं. पण आता फटाके बंदीचा प्रस्ताव फेटाळल्याने या व्यापाऱ्यांन मोठा दिलासा मिळाली आहे.

जळगावात नियमानुसारच फटाके विक्री – युसूफ मकरा

देशभरात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर कामकाज सुरू असून तोवर नागपूरच्या संशोधन संस्थेकडून तपासण्यात आलेल्या फटाक्यांना विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. जळगावात विक्रीसाठी असलेले फटाके हे संशोधन संस्थेकडून तपासूनच विक्री केले जातात. विभागीय आयुक्तांच्या आदेशाबाबत जळगावातील व्यापाऱ्यांकडे अद्याप अधिकृत माहिती प्राप्त नाही पण ते निर्णय मागे घेतला असल्याचे कळाले आहे. असे फटाके विक्री असोसिएशनचे कार्याध्यक्ष युसूफ मकरा यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज