पारोळा तालुक्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १० रोजी घडली. देवीदास शालिक पाटील (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

याबाबत असे कि, देवीदास पाटील यांच्याकडे दोन बिघे शेती आहे. त्यासाठी त्यांनी विकास सोसायटी व हातउचल असे दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने पाठ ते नैराश्यात गेले होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी १० रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना उघड होताच ग्रामस्थांनी धाव घेत, देवीदास पाटील यांना खाली उतरवले. तसेच खासगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.  पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -